Nanded Accident News : अर्धापुरवरुन नांदेडकडे येणाऱ्या एक जीपने दुभाजकाला ओलांडून दुसऱ्या बाजूच्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत 2 प्रवाशांची मृत्यू झाला आहे, तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जीपमध्ये एकूण 8 प्रवासी होते. पिंपळगांव महादेव पाटीजवळ हा अपघात झाला आहे. जखमींना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सोबतच काहींनी वाद घातल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. इतका मोठा भीषण अपघात होऊन घटनास्थळी मात्र एकच पोलीस कर्मचारी होता. दरम्यान, या अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अपघाताची भीषणता दिसत आहे. वेगाने येणारी कार दुभाजकाला धकडून दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रकला जोरदार धडकली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी झालेल्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या: