Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया देताना आज भाजपवर टीकास्त्र देखील सोडले. नागपूरमध्ये ईडीने अॅड. सतीश उके यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांचे नाना पटोलेंशी नाव जोडले जात होते. फडणवीस यांनी तसा आरोप केला होता. याबाबत बोलताना नाना यांनी, ''देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मित्र आहोत. गडकरी आणि रश्मी शुक्ला यांच्या केसमध्ये उके माझे वकील आहेत आणि केस लढले म्हणून असा संबंध लावला जातो का? काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय म्हणून आम्हाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. तसंच उके यांच्या वडिलांनी केलेले आरोप चौकशीचा भाग आहे.'' असंही पटोले यावेळी म्हणाले.
ईडी कारवाईचे कार्यक्षेत्र बदललं असून ईडीला भाजपने चिल्लर बनवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा. असंही नाना म्हणाले. दरम्यान महाराष्ट्र पोलीस कुणाच्या दबावात कारवाई करतात? कुणाच्या दबावात येऊन कारवाई व्हायला लागली तर, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहणार नाही, असंही नाना म्हणाले.
'योग्य वेळी घोटाळे बाहेर काढू'
आमच्याकडे हातोडा आहे आणि भाजपला सत्तेची गरमी झाली आहे. उतरवायची कशी हे आम्हाला माहित आहे, त्यांच्यासारखं टुकटुक मारण्यापेक्षा आमच्याकडे हातोडा आहे. योग्य वेळेस तो चालवू, असं म्हणत नानांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नागपूर महानगरपालिकेत अनेक घोटाळे घडत असून इथे चालवणाऱ्या बसेसमध्येही भ्रष्टाचार झाला आहे, कमिशन खान्यासाठी आपली बसचा वापर होत असून योग्य वेळी घोटाळे बाहेर काढू, असंही नाना म्हणाले.
हे ही वाचा-
- Satish Uke : अॅड. सतीश उकेंना मुंबईला आणलं; आज ईडी कोर्टात हजेरी, उकेंचा भाऊही ताब्यात
- Sanjay Raut : ईडीचा तपास हा राज्याच्या गृहखात्यावरचं आक्रमण, गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा.... : संजय राऊत
- अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत, राऊतांचा भाजपला टोला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha