Sanjay Raut : राज्यकर्ते या देशातील जनतेला नेहमीच एप्रिल फुल करत असतात. महागाई वाढली, इंधनाच्या किंमती वाढल्या, जनतेचे प्रश्न सोडवण्याठी काही केलं जात नाही. वर्षानुवर्ष झालं एप्रिल फुल सुरु असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. पाच राज्याच्या निवडणुकीत सरकारने जनतेला एप्रिल फुल केलं आहे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील म्हणून लोक गेल्या 7 वर्षापासून वाट बघतायेत, पण हे एप्रिल फुल असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा लगावला. 


एप्रिल फुल हा गंमतीचा विषय राहिला नसून, हा जनतेच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झाला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणे, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे राऊत म्हणाले. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील याची लोक 7 वर्षापासून वाट बघतायेत असेही राऊत म्हणाले. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच आहे. महाराष्ट्र किंवा देशात सुडाचे राजकारण करत नाही असे सांगणे हे एप्रिल फुलच असल्याचे राऊत म्हणाले. एप्रिल फुलची मालिका गेल्या अनेक वर्षापासून सुरु असल्याचे राऊत म्हणाले.


नागपूरचे वकिल सतीश उके यांच्यावर जी ईडीने कारवाई केली, त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सतीश उके यांचे काही अपराध असतील, त्यांनी व्यवहार चुकीचे केले असतील, जमीन बळकावली असेल, धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने येऊन तपास करावा, कारवाई करावी असा गुन्हा नसल्याचे राऊत म्हणाले. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारचा तपास करण्यास सक्षम असतात. त्यांच्या कुटुंबानी कोणाला धमक्या दिल्या असतील, खोट्या तक्रारी दिल्या असतील तर पोलीस तपास करतील. त्यासाठी ईडी आणि सीबीआयने यायची गरज नाही. त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी आणले जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राज्यातील  गृहखात्याने अधिक कठोर होण गरजेचं असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.


नवीन वर्ष सुरु होत आहे. हे वर्ष सर्वांसाठी तणावमुक्त जावो. सुखाचे भरभराटीचे जावो असी शिवसेनेची संकल्पना आहे. महाराष्ट्राचीही भरभराटी होवो. महाराष्ट्रावरती भविष्यात हिंदुत्वाचा भगवा झेंडा (महाविकास आघाडीचा) फडकत राहो, यासाठी आम्ही काम करत राहू असेही राऊत यावेळी म्हणाले.