Nana Patole on Sangram Thopate : माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. ते येत्या 22 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पक्षाला सोडचिठ्ठी देताना थोपटे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. यावर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोलेंनी माजी आमदार संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मोठ केलं, नावारुपाला आणलं त्याच्यावर आरोप करायचे नसतात, असं म्हणत जिकडे तुम्ही जाऊ पाहता तिकडे फार अंधार आहे असा सल्ला देखील पटोलेंनी थोपटेंना दिला आहे. दरम्यान, संग्राम थोपटे यांचा काँग्रेसला राम राम या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विदर्भातील शिक्षक घोटाळ्याची एसआयटी मार्फत नव्हे तर हायकोर्टच्या जजच्या माध्यमातून चौकशी व्हावी
विदर्भामध्ये शिक्षक भरती घोटाळा समोर आलेला आहे. यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विचारले असता शासनाच्या बगलबच्च्यांची अनेक शाळा कॉलेज आहेत. अशा लोकांना त्यांच्या परिवाराला फायदा देण्यासाठी राज्यकर्त्यांनी काम केलं आहे. ते आता प्रशासनावर ढकलत आहेत. यामध्ये प्रशासन जितका दोषी आहे तेवढेच शाशनकर्ते देखील यात दोषी आहेत. त्याच्यामुळं यांची चौकशी ही एसआयटी मार्फतच नव्हे तर हायकोर्टाच्या जजमार्फत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार पटोले यांनी केली आहे.
शेतकरी सरकारला जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत
धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, चार महिन्यांचा कालावधी उलटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप बोनस जमा झालेलं नाही. यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं म्हणून ही सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकरी यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देखील नाना पटोले यांनी महायुती सरकारला चांगलाच धारेवर धरला असून यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे असे नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: