Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबईमध्ये बोलत असताना काही मुद्यांवर चर्चे केली. काही दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये बोलत असताना मोहन भागवत यांनी सांगितलं होतं की, '15 वर्षांनी भारत पुन्हा अखंड भारत बनेल आणि हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहू.' याबाबत नाना पटोले म्हणाले, 'अखंड भारताचं व्हीजन काय हे देशापुढे मांडावं...देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल...' तसेच राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत देखील नाना पटोले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधी मुंबई दौ-यावर येतील. येथे ते आमदार, मंत्री, पदाधिका-यांना भेटतील.' 


राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीत्या प्रमुख नेत्यांची राहुल गांधी भेट घेतील. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून निमंत्रण मिळाले तर राहुल गांधी नक्कीच मातोश्रीवर जायला हरकत नाही. तसेच महाराष्ट्रातील कॉमन मिनीमम प्रोग्राम, महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाकरता राहुल गांधी महत्वपूर्ण भेटी घेतील, असही नाना पटोले यांनी सांगितलं. 
राहुल गांधींच्या दौ-याची तारीख अद्याप निश्चित नाही...


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धडाधड 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. याबाबत नाना पटोले म्हणाले, 'आता टिवटीव कामाची नाही. जनतेच्या प्रश्नांकरता काम करा. चार पट पैसे नागरिकांच्या खिशातून लुटले गेलेत. राज्यालाही सेसचा फायदा होत नाही. आरोप लावण्याऐवजी केंद्राकडून महागाई नियंत्रीत करण्याची गरज.'


सध्या चर्चेत असलेल्या लाऊडस्पिकरच्या मुद्यावर नाना पटोले म्हणाले, सर्वच धर्मामध्ये लाऊडस्पिकर वापरला जातो. एकाच धर्माला टार्गेट करु नये .संविधान कोणत्याही धर्माचा द्वेष करायला सांगत नाही.धर्माचा द्वेष करुन राजकिय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला जातोय. ध्वनिप्रदुषणाबाबत सर्वच धर्मांना लागु होईल अशी पॉलिसी तयार करायला हवी. सर्व धर्माच्या धर्मगुरुंशी बोलुन एक पॉलिसी तयार करावी.मात्र, धर्माच्या ठेकेदारांनी यात आग ओतु नये . धार्मिक तेढ निर्माण करणा-या कोणीही असो कारवाई करायला हवी. '


महत्त्वाच्या बातम्या: