पुण्यातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुलींनी अशा घटनांचा प्रतिकार केला पाहिजे. तसंच स्वरक्षणासाठी एखादी गोष्ट केली तर कायद्याने तुम्हाला काहीही होणार नाही, असं मत नानांनी व्यक्त केलं आहे.
अत्याचार होत असताना मुलींनी प्रतिकार करायलाच हवा. मात्र तरुणांनीही अशा विकृतींना ठेचलं पाहिजे. जिच्यावर अत्याचार होत आहे, ती आपली बहिण, वहिनी, आई आहे, असं समजून त्यांनी तिचं संरक्षण करायला हवं, असंही नाना पाटकेर यांनी सांगितलं.
कोपर्डी प्रकरणाला जातीयरंग दिला जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र जात हा कॉलमच हटवायला पाहिजे. भारतीय ही एकच जात असल्याचं प्रत्येकाने मानलं पाहिजे, असंही नाना म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेत पडसाद
दरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत.
इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी काल विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.
कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार
13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या