बीडः भगवान बाबांचं आजोळ असलेल्या लोणी गावात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनेच हा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यात हे गाव आहे.
या गावात खंडोजीबाबा गडावर नामदेव शास्त्री गेल्या 10 वर्षांपासून येतात. मात्र शास्त्रींनी भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या भाषणाला विरोध केल्याने ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच यांनी ग्रामस्थांच्या मताने हा निर्णय झाला.