....म्हणून फडणवीसांनी गृहखातं स्वत:कडे ठेवलंय : जयंत पाटील
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2016 07:51 PM (IST)
सांगली : फडणवीस सरकारमध्ये बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंचीच संख्या इतकी आहे की विरोध करण्यासाठी बाहेरच्याची फारशी गरज सरकारला दिसत नाही. इतका अंतर्गत संघर्ष सरकारमध्ये पाहायला मिळतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज सांगलीत केली. सहकाऱ्यांवर विश्वास नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवलं आहे. पण गृहखाते स्वतःकडे ठेवून अजून किती किंमत मोजायची हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचा चिमटाही जयंत पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्री भाषणात कितीही मोठे बोलत असले, तरी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरले असून गृहखाते हे वेगळ्या माणसाकडे असावं, याचा पुनरुचार देखील जयंत पाटील यांनी केला.