नागपूर : नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांच्यासह खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारासाररख्या विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन तापण्याची चिन्ह आहेत.
दुसरीकडे, विरोधक उद्या विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.
आपल्याकडे 'हल्लाबोल' करणाऱ्यांचे 'डल्लाबोल' पुरावे : मुख्यमंत्री
नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरातला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.
ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.
दरम्यान, ओखी वादळामुळे जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं युती सरकारच्या काळात झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पात्र असून कर्जमाफीसाठी अर्ज न करता आलेल्या शेतकऱ्यांनाही संधी : मुख्यमंत्री
आपल्याकडे 'डल्लाबोल' पुरावे : मुख्यमंत्री
ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे.
नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. इतकंच नाही, तर विरोधकांची गाडी ही अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी, जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर