नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एमएड करणाऱ्या एका विद्यार्थिनीने नागपुरातील अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी आपण विद्यापीठात एमएड करत होतो. त्यावेळी तिथल्या हिंदी विषयाच्या विभाग प्रमुखांच्या केबिनमध्ये गौरीशंकर पाराशर यांनी आपला विनयभंग केला, अशी तक्रार विद्यार्थिनीने केली आहे. घटनेच्या वेळी गौरीशंकर पाराशर निवृत्त झाले होते, मात्र विभागप्रमुखांच्या केबिनमध्ये येऊन बसायचे, असं तिने सांगितलं.
या प्रकरणी पोलिसांनी हिंदी विभागाच्या तत्कालीन विभागप्रमुखांनाही आरोपी केलं आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
नागपूर विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरुंवर विनयभंगाचा गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2018 10:02 AM (IST)
एमएड करणाऱ्या एका विद्यार्थिनीने नागपुरातील अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये डॉ. गौरीशंकर पाराशर यांच्याविरोधात तक्रार केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -