Nagpur University News : नागपुरात भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात येत आहे. याचे यजमानपद यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) मिळाले आहे. मात्र येणाऱ्या मान्यवरांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या वसतिगृहाचे 'गेस्ट हाऊस'मध्ये रुपांतर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या संदर्भात विद्यापीठाने वसतिगृहात नोटीसही लावली असून ऐन परीक्षेच्या काळात विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात 1974 नंतर म्हणजे 49 वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात येत आहे. 3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते.
दरवर्षी भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (Indian Science Congress) या परिषदेचे आयोजन केले जाते. मात्र या आयोजनाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल असा विद्यार्थ्यांचा अंदाज होता. मात्र विद्यापीठातर्फे अशा प्रकारे मनमानी निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थी संघटनाही आंदोलनाच्या तयारी असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांना खोली रिकामी करुन घरी निघून जाण्याची नोटीस
नागपूर विद्यापीठाने एक नोटीस काढून आपल्या विद्यार्थ्यांना चक्क गावाला निघून जाण्याचा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यापीठाने आपल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खोली रिकामी करुन घरी निघून जाण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कुठे जायचे, हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उपस्थित झाला आहे. मात्र स्वतः आयोजक असलेल्या नागपूर विद्यापीठाला इंडियन सायन्स काँग्रेससाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात विद्यापीठाला विचारले असता त्यांनी आमंत्रितांना राहण्यासाठी खोल्यांची गरज असल्यामुळे विद्यार्थ्यांना खोली रिकामी करायला सांगितले. सोबतच विद्यार्थी आणि त्यांच्या साहित्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न विद्यापीठ करत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
ही बातमी देखील वाचा
Indian Science Congress : नागपुरात 49 वर्षांनंतर प्रथमच 'इंडियन सायन्स काँग्रेस'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI