हेडलाईन्स:
1. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह रात्रभर जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचलं, लोकल 20 मिनिटं उशिरानं तर नवी मुंबईतही 2 तास पावसाची बॅटिंग
--------------------------------
2. आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी भारतासह जगभरातले देश सज्ज, फरीदाबादमध्ये रामदेव बाबांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात तर चंदीगडच्या कार्यक्रमात पंतप्रधान योग साधणार
--------------------------------
3. संरक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रात 100 टक्के एफडीआय, केंद्र सरकारचा निर्णय, राजन यांच्या राजीनाम्यानंतर अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याचा प्रयत्न
--------------------------------
4 . राजन यांच्या भारतीयत्वावर शंका घेणं आचरटपणा, नरेंद्र जाधव यांचा स्वामींवर हल्लाबोल, भाजपलही खडेबोल सुनावले
--------------------------------
5. केवळ दैव बलवत्तर म्हणून कर्नाटकात ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर बचावले, नदीला पूर आलेला असतानाही ट्रक पाण्यात घातला, दृश्यं कॅमेऱ्यात कैद
--------------------------------
6. मुक्त विद्यापीठाच्या पदवीसाठी सरकारी अधिकाऱ्यांचा कॉपी पॅटर्न, नांदेड विभागात 8 हजार जणांवर कारवाई, सेवा-शर्तीनुसार कारवाईची शिफारस
--------------------------------
7. शिवसेनेच्या हिशेबावर भाजपचं लक्ष, राज्य सरकारकडून पालिकेत मुख्य लेखापालांची नियुक्ती, शिवसेनेची कोंडी कऱण्याचा प्रयत्न
--------------------------------
8. माहीम सबस्टेशनमधून बॅटऱ्या चोरीला गेल्यानं पश्चिम रेल्वेचे तीनतेरा, काल गर्दीच्या काळात तासभर खोळंबा, प्रवाशांना अतोनात मनस्ताप
--------------------------------
9. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना जत आणि फोंड्यात ट्रेनिंग, सीबीआयच्या सूत्रांची माहिती, तर वीरेंद्र तावडे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
--------------------------------
10. हरारेच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची झिम्बाब्वेर दहा विकेट्सनी मात, धोनी ब्रिगेडनं साधली मालिकेत बरोबरी