संबंधित बातमी - आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!
गेल्या दोन दिवसांपासून रिंकूचं नाव शाळेच्या हजेरी पटावरुन काढणार असल्याची चर्चा व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.
संबंधित बातमी - 'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकते. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली 'आर्ची' यंदा दहावीत गेली आहे. मात्र शाळा सुरु होऊन आठवडा उलटला तरीही अद्याप ती शाळेत परतली नाही.
‘सैराट’मध्ये आर्ची अॅव्हरेज स्टुडंट असली तरी रिंकू प्रत्यक्षात हुशार आहे. त्यामुळे तिची शाळा बुडल्याचा, अभ्यास बुडल्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं शिक्षकांचं मत आहे.
29 एप्रिलला ‘सैराट’ रिलीज झाला. सिनेमाने ‘सैराट’ कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. रिंकूने ‘सैराट’मधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं झालं. आता तिच्यासाठी दहावीचा टर्निंग पॉईंट आहे. तिथंही तिला सैराट यश मिळो.