नागपूर : नागपूरच्या शिल्पा अग्रवाल यांनी 'मिसेस युनिव्हर्स लव्हली' हा किताब पटकावला आहे. बारावी पास असलेल्या शिल्पा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मजल मारली आहे. विशेष म्हणजे कधीकाळी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिल्पा यांचा हा किताब मिळवण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे
नागपूरच्या शिल्पा अग्रवाल. दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बनमध्ये त्यांना 'मिसेस युनिव्हर्स लवली' हा किताब मिळाला. पण इथवर पोहचण्याचा शिल्पा यांचा प्रवास सोपा नव्हता. बारावी पास झाल्यावर वयाच्या 18 व्या वर्षी शिल्पाचं लग्न झालं.
20 व्या वर्षी मुलगा झाला. पण सासूसोबत झालेल्या भांडणामुळे शिल्पानं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एक आठवडा रुग्णालयात शिल्पा यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यानंतर शिल्पा यांचे पती आकाशनं त्यांना आधार दिला. व्यवसाय करण्यास उद्युक्त केलं. स्वातंत्र्य दिलं. आणि शिल्पा यांनी त्याचं सोनं केलं.
शिल्पा यांना यापूर्वीच मिसेस युनिव्हर्स साऊथ सेंट्रल एशिया किताबानं गौरवण्यात आलं आहे. शिल्पाच्या साऱ्या कर्तृत्वामागे त्यांचे पती आणि मुलाचाही मोठा वाटा आहे.
शिल्पा यांनी कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर उद्योग जगतातही पाऊल टाकलं. परदेशात फर्निचरचा उद्योग वाढला. त्या स्वत: कंपनीच्या सीईओ आहेत. त्यामुळे शिल्पा यांच्याप्रमाणे प्रत्येक महिलेने स्वप्नांना कर्तृत्वाचे पंख द्यावेत.
आत्महत्येचा प्रयत्न ते मिसेस युनिव्हर्स, नागपूरची शिल्पा अग्रवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2017 11:20 PM (IST)
सासूसोबत झालेल्या भांडणामुळे शिल्पानं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एक आठवडा रुग्णालयात शिल्पा यांनी मृत्यूशी झुंज दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -