नागपूर : नागपूर पोलिसांनी हवाला व्यवसाय (hawala traders) करणाऱ्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक केला आहे. काल रात्री इतवारी परिसरात हवाला व्यापाऱ्यांवर मारलेल्या धाडीत 84 लाखांची रोकड जप्त केली आहे.  भुतडा चेंबर या इमारतीत पोलिसांना मोठ्या संख्येने खाजगी लॉकर्स आढळले असून त्यापैकी काही लॉकर उघडल्यानंतर ही 84 लाखांची रोकड हस्तगत झाली आहे. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लॉकर असून ते पोलिसांनी सील केले आहे. त्यामधूनही हवाला व्यापाराची रोकड निघण्याची शक्यता आहे. या कारवाईनं नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसून आणखी जास्त रक्कम हस्तगत होऊ शकते असा अंदाज आहे.


Karnataka : फिल्मी स्टाईल रेड, 500... 2000 रुपयांच्या नोटाच नोटा; पण कुठे? तर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये


दोन्ही इमारतीत सुमारे साडेनऊशे लॉकर्स

नागपूर पोलिसांनी इतवारी परिसरातील अनाज बाजारात दोन इमारतींवर छापेमारी करत तब्बल 84 लाख रुपयांची बेहिशोबी  रोकड जप्त केलीय. खाजगी लॉकर्समध्ये साठवलेला हा सगळा पैसा हवालाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. धक्कादायक म्हणजे या कारवाई दरम्यान पोलिसांना दोन्ही इमारतीत सुमारे साडेनऊशे लॉकर्स आढळून आले आहे. हे लॉकर्स कोणाचे आहे याची माहिती पोलीस घेत असून त्यामध्ये कोट्यवधींचा काळा पैसा असल्याची शक्यता आहे. झोन तीनचे उपायुक्त गजानन राजमाने यांना नागपूरच्या इतवारी परिसरात काही इमारतींमधून हवालाचा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याची आणि त्या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी खाजगी लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड साठवलेल याची माहिती मिळाली होती.

 

शुक्रवारी रात्री पोलिसांच्या अनेक पथकांनी इतवारी आणि आजूबाजूच्या परिसरात एकत्रितपणे कारवाई सुरू केली. पोलिसांनी अगोदर भुतडा टॉवर येथे कारवाई केली.. त्यानंतर जवळच असलेल्या गणेश टावर मध्येही कारवाई सुरू केली.. पोलिसांना एका ठिकाणी 44 लाख तर दुसऱ्या ठिकाणी 40 लाखांची बेहिशेबी रोकड पोलिसांच्या हाती लागली.. धक्कादायक म्हणजे दोन्ही इमारती मिळून सुमारे साडेनऊशे लोकर्स ही पोलिसांना आढळले आहेत... पोलिसांनी संपूर्ण कारवाईची आणि त्याठिकाणी साडेनऊशे लॉकर्स आणखी असल्याची माहिती आयकर विभागाला दिली असून आयकर विभागाने आता या दोन्ही इमारतीमध्ये त्यांचा तपास सुरू केला.

नागपूरच्या इतवारी परिसरातील मस्कासाथ बाजारात नागपूर पोलिसांनी धाड टाकली. भुतडा बिल्डिंग तसेच गणेश टॉवर या दोन इमारतींमध्ये जोन 3 चे डीसीपी गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात धाड टाकली. या इमारतीमध्ये काही खाजगी लॉकर्स असून त्यामध्ये हवाला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने रोकड लपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. 


काल रात्रीपर्यंत दोन लॉकर्स उघडण्यात आले होते, त्यामधून 44 लाख रुपयांची रक्कम जप्त झाली आहे.  तर त्याठिकाणी असलेले इतर अनेक खाजगी लॉकर्स उघडल्यानंतर हवाला व्यवसायाची ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.  ही सर्व रक्कम बेहिशेबी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


70 रुपयांमुळं बाजार उठला! सत्तर रुपयांची लाच घेणाऱ्या महाभागाला नागपुरात एसीबीकडून बेड्या