Nagpur News Updates : देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री आपल्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता थकले आहेत. ते मंत्री दुसरे कोणी नाही तर संपूर्ण देशात 'रोडकरी' अशी ओळख असलेले नितीन गडकरी आहेत. गडकरी यांच्या या व्यथेला कारण ठरलं आहे, लोकांचं सतत तक्रारींचा सूर. नागपुरात एबीपी माझाच्या विदर्भ संपादक सरिता कौशिक यांच्या "बेटर दॅन द ड्रीम.. अ पीपल्स स्टोरी" या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली दरम्यान 1 लाख कोटींच्या खर्चाचा ग्रीन हायवे जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले.
मात्र, एवढं महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही असे गडकरी म्हणाले. अवघ्या दोन किमीचा रस्ता बांधताना लोकांच्या सततच्या तक्रारींमुळे गेले अनेक वर्ष घरासमोरचा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. आता मी थकलो आहे असे गडकरी म्हणाले.
लोकं किती तक्रारी करतात आणि न्यायालय ही त्यांच्यावर निर्णय देताना किती कालावधी लावतो याचा विचार होण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. आता एखादा पुस्तक या दिरंगाईबद्दलही तयार केलं पाहिजे आणि ते प्रत्येक न्यायाधीश आणि वकिलांना पाठवलं पाहिजे असे गडकरी म्हणाले. माझ्या घरसमोरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे मी गेले सहा वर्ष माझ्या जन्मस्थान असलेल्या महालात राहत नाहीये अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. आता महालातला तो रस्ता पूर्ण करू शकत नसल्यामुळे इतर दोन रस्त्यांचे काम सुरु करण्याचे ठरविल्याचे गडकरी म्हणाले.
उत्तरप्रदेशात हवाई बस
गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं होतं की, प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्याआधी त्यांनी विमानंही उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले असंही म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या