Nagpur : देशभरात रस्ते बांधले, पण 2 किमीचा रस्ता बांधता येईना; रोडकरी Nitin Gadkari यांची खंत
ज्यांनी देशात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं उत्कृष्ट जाळं विणलं, ज्यांना त्यांच्या रस्ते बांधण्याच्या धडाक्यामुळे संपूर्ण देश रोडकरी म्हणून ओळखतो, अशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मात्र बांधता आलेला नाही. नागपुरातल्या कार्यक्रमात गडकरी यांनी ही व्यथा बोलून दाखवली.... नागपूरात एबीपी माझाच्या विदर्भ संपादक सरिता कौशिक यांच्या "बेटर दॅन द ड्रीम.. अ पीपल्स स्टोरी" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी आपल्या मनातली ही खंत जाहीरपणे व्यक्त केली.