Nagpur Dams Water Storage : राज्यासह विदर्भातील बहुतांश भागात पाणी टंचाईचे (Water Storage) भीषण सावट असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक धारणांमधील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. राज्यात मान्सून दाखल होईपर्यंत पाण्याचे संकट (Water Shortage Issue) आणखी गडद होण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे. अशातच नागपूकरांना (Nagpur News) दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.


कारण नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. एकट्या तोतलाडोह धरणात ऐन उन्हाळ्यात देखील 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.


नागपूरकरांची  चिंता मिटली!


नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. मात्र, गेल्या वेळी राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक मोठ्या धरणांचीही (Dam) पाणीपातळी खालावली आहे. तर गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना झालंय, तर नळातून पाणी येण्यासाठी 8 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. हे चित्र विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत बघायला  मिळत आहे. असे असताना नागपूरकरांना काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे.


तोतलाडोह 50 टक्के भरलेलं


नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोहमध्ये आजच्या स्थितीला 50 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा 10 टक्क्यांनी कमी असला तरी नागपूरची तहान भागणार असल्याने चिंता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आलीकडे विदर्भात झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. तोतलाडोह धरणाची क्षमता 1016 दशलक्ष घन मीटर आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांची स्थिती उन्हाळ्यातही चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे. आज जलसाठा चांगला असल्याने एक दुष्काळ सहन करू शकेल, अशी एकंदरीत स्थिती नागपूरची आहे. तसेच आगामी पावसाळ्यात यात आणखी वाढ होईल, असे पेंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


काय सांगते आकडेवारी ?


नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात 50 टक्के इतका जलसाठा आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 59 टक्क्यांपर्यंत होते. नवेगाव खैरीमध्येही 94 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात 71 टक्के साठा होता. त्याचप्रमाणे इतर खिंडसी जलाशयात 60 टक्के, तर वडगाव जलाशयात 45 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या