LIVE: नगरपालिका निकाल: सर्व 11 नगरपालिकांचे निकाल
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2017 07:46 AM (IST)
नागपूर : विदर्भातील 11 नगरपालिका आणि नगपरिषदांच्या निकालात सध्या भाजपची सरशी होताना दिसत आहे. तीन नगपालिकांवर भाजपचं कमळ उमललं असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एका नगरपरिषदेवर झेंडा फडकला आहे. एका ठिकाणी स्थानिक आघाडीला यश मिळालं असून नरखेड पालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तर नगराध्यक्षपदी भाजपचा वरचष्मा असून चार ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. याशिवाय काँग्रेसला एका ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आलं आहे. तसंच स्थानिक आघाडीचा एक नगराध्यक्षही विजयी झाला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगरपरिषदा मिळून एकूण 11 नगरपालिकांचा समावेश आहे. **************************************************************** सावनेर - एकूण जागा - 20 भाजप - 14 काँग्रेस - 06 नगराध्यक्ष - रेखा मोवाडे, भाजप *************************** उमरेड - एकूण जागा - 25 भाजप - 19 काँग्रेस - 6 नगराध्यक्ष - विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप *************************** काटोल - एकूण जागा - 23 विदर्भ माझा - 18 शेकाप - 4 भाजप - 1 काँग्रेस - 0 राष्ट्रवादी - 0 नगराध्यक्ष - वैशाली ठाकूर, विदर्भ माझा *************************** नरखेड - एकूण जागा - 17 राष्ट्रवादी - 8 नगरविकास आघाडी - 5 शिवसेना - 3 अपक्ष -1 नगराध्यक्ष - अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी *************************** खापा नगरपरिषद - एकूण जागा - 17 भाजप - 15 काँग्रेस - 1 अपक्ष - 1 नगराध्यक्ष - प्रियांका मोहिते, भाजप *************************** मोहपा - एकूण जागा - 17 काँग्रेस - 10 भाजप - 5 शिवसेना - 2 नगराध्यक्ष - शोभा कऊटकर (काँग्रेस) *************************** तिरोडा नगरपरिषद - एकूण जागा 17 राष्ट्रवादी - 9 भाजप - 5 शिवसेना 2 अपक्ष - 1 नगराध्यक्ष - सोनाली देशपांडे (भाजप) *************************** कामठी - एकूण जागा - 32 काँग्रेस - 7 भाजप - 2 शिवसेना - 1 बसपा -1 अपक्ष - 1 MIM -1 नगराध्यक्ष - *************************** कळमेश्वर नगरपरिषद - एकूण जागा - 17 काँग्रेस - 8 राष्ट्रवादी - 2 भाजप - 5 शिवसेना 2 भाजप 5 नगराध्यक्ष - स्मृती इखार (भाजप) *************************** रामटेक एकूण जागा - 17 भाजप -13 शिवसेना - 2 काँग्रेस - 2 नगराध्यक्ष - दिलीप देशमुख, भाजप *************************** गोंदिया - एकूण जागा - 42 भाजप - 18 राष्ट्रवादी – 7 काँग्रेस – 9 शिवसेना – 2 बसपा - 5 अपक्ष - 1 नगराध्यक्ष – अशोक इंगळे, भाजप *************************** नागपूर जिल्हानिहाय कोणाला कुठे बहुमत? भाजप - रामटेक, उमरेड, सावनेर, खापा, काँग्रेस - कळमेश्वर (राष्ट्रवादीसह ), मोहपा राष्ट्रवादी - नरखेड (काठावरचे बहुमत) विदर्भ माझा - काटोल नगराध्यक्ष भाजप - रामटेक, कळमेश्वर, सावनेर, खापा, उमरेड काँग्रेस - मोहपा राष्ट्रवादी - नगरविकास आघाडी - नरखेड विदर्भ माझा - काटोल LIVE: चौथ्या टप्प्यातील नगरपरिषदांसाठी मतमोजणी सुरु, काटोलमध्ये विदर्भवाद्यांनी खातं उघडलं नगरपरिषदांमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचाही समावेश आहे. सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत.