राज्यात 11 जानेवारीपासून दूध 2 रुपयांनी महागणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2017 05:18 PM (IST)

NEXT
PREV
पुणे/ कोल्हापूर: राज्यात 11 जानेवारीपासून दूध 2 रूपयांनी महागणार आहे. खाजगी आणि राज्य सहकारी दूध संघाची बैठक पुण्यातील कात्र जिल्हा दूध संघाच्या मुख्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती अध्यक्ष विनायकराव पाटील, उपाध्यक्ष योगेश म्हस्के, चितळे डेअरीचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.
या बैठकीवेळी गाईच्या खरेदी दरात ३ रुपयांची वाढ विक्री दरात २ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून 22 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणार दूध आता 25 रुपये प्रतिलिटरने खरेदी करण्यात येणार आहे. तर पूर्वी या दूधाची विक्री 40 रुपये प्रतिलिटरने करण्यात येत असे, मात्र आता याची विक्री 42 रुपये प्रतिलिटरने करण्यात येणार आहे.
याशिवाय म्हशीच्या दुधाच्या दरातही लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -