नागपूर : नागपूर मेट्रोने खऱ्या अर्थाने वेग पकडला आहे. सध्या 25 किलोमीटर वेगाने जॉय राईड सुरु असलेल्या नागपूर मेट्रोची 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाचे टेस्टिंग सुरु आहे. वेग आणि त्याची सुरक्षा ह्याचे टेस्टिंग करणारी सिव्हिल एव्हिएशनची संघटना सध्या नागपूर मेट्रोच्या ह्या वाढत्या वेगाचे टेस्टिंग करत आहे.


या टेस्टिंगमध्ये मेट्रोला भरपूर केबल्स लावून वेगाची आणि सुरक्षेची तपासणी केली जाते. नागपूर मेट्रोने यशस्वीरित्या सध्या 90चा स्पीड गाठला आहे. मेट्रोचा सरासरी स्पीड 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असला, तरीही एखाद्या पॉईंटला मेट्रो 80ला पोहचत असते आणि 80ची स्पीड गाठायची असेल, तर 90 किलोमीटर प्रतितासाचं यशस्वी टेस्टिंग पूर्ण करावं लागतं.


वेगवेगळे टप्पे पूर्ण करून नागपूर मेट्रोला स्पीड आणि सुरक्षेचं सर्टिफिकेट येत्या एका महिन्यात मिळेल. तरीही मेट्रो मात्र जॉय राईडच सुरु ठेवणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना ह्या वाढलेल्या स्पीडचा फुकट आनंद येते काही दिवस घेता येणार आहे.


सध्या नागपूर मेट्रोचा पाच किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात तीन स्टेशन्सचा समावेश आहे.