नोटाबंदीमुळे त्रास होतोय, सुसाईड नोटमध्ये उल्लेख करत आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 08:17 AM (IST)
नागपूर : नागपूरमध्ये अनंत बापट या 58 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर होणाऱ्या त्रासाचा उल्लेख बापट यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. नागपुरातील सावनेरमध्ये ही रविवारी ही घटना घडली. मुलगा घराबाहेर गेल्याच पाहून अनंत बापट यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनंत बापट यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनंत बापट शेती उपयोगी यंत्र आणि पाईपचा व्यवसाय करत होते. परंतु नोटाबंदीनंतर त्यांना व्यवसायात मोठं नुकसान झालं. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिल आहे, असं मुलाने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.