नागपूरच्या अत्यंत जुन्या महाल भागातील अरुंद केळीबाग रस्ता आता विस्तारणार आहे. त्यासाठीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्याची काही जमीन घेतली जाणार आहे.
गडकरी वाड्याला लागून असलेला केळीबाग रस्ता आता 80 फूट रुंद होणार आहे. यासोबतच परिसरातील अनेक छोटी छोटी दुकाने आणि घरं जाणार असल्यामुळे सर्वसामान्यही धास्तावले आहेत.
गडकरी वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या जमीनमालकांचे कित्येक दशकांपासून भाडेकरु आहेत. पैसे किंवा टीडीआर मिळणार नसल्याने भाडेकरुंची गैरसोय झाली आहे, त्यामुळे मालक जरी कोर्टात धावले तरी भाडेकरुंनी गडकरींकडे धाव घेतली आहे.