गळ्यावर कात्रीचे वार, नागपुरात भरदिवसा गृहिणीची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 06:08 PM (IST)
नागपूर : नागपुरात भरदिवसा झालेल्या एका गृहिणीच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील उच्चभ्रू ओमनगर परिसरात शशिकला भामरे यांचा हत्या करण्यात आली. शशिकला यांच्या गळ्यावर कात्रीने वार करुन त्यांना जीवे मारण्यात आलं. त्यांचा मुलगा प्राध्यापक आहे, तर सूनही नोकरीनिमित्त दिवसा घराबाहेर असते. त्यामुळे शशिकला दुपारी घरी एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात मारेकऱ्यानं भामरेंच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर गळ्यावर कात्री मारुन महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ओमनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या घटनेनं नागपुरात खळबळ उडाली आहे.