यवतमाळमध्ये कुलरमधून वीजेचा धक्का, मायलेकीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 04:58 PM (IST)
यवतमाळ : नादुरुस्त कुलरमधील वीजप्रवाहाच्या धक्क्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील कळमनेरमध्ये घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 23 वर्षीय सोनाली वानखेडे प्रकृती ठीक नसल्याने दुपारी कुलर लावून झोपायला गेली होती. तेव्हा वीजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. त्याच वेळी 3 वर्षांची पंखुडीही खेळत खेळत तिच्याजवळ गेली आणि वीज प्रवाहाच्या धक्क्याने तिचाही मृत्यू ओढावला. एकाच अपघातात मायलेकीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कळमनेर गावावर शोककळा पसरली आहे.