शिवसेना आमदाराची शेतकऱ्याला मारहाण
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 26 Sep 2016 03:27 PM (IST)
औरंगाबाद: औरंगाबादमधील पैठणचे सेना आमदार संदीपान भुमरेंची शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली. साखर कारखान्याच्या सभेत प्रश्न विचारल्यानं तिळपापड झालेल्या भुमरेंनी शेतकऱ्याला मारहाण केली. औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेवेळी जयाजीराव सुर्यवंशी या शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता. यामुळे संतप्त आमदार भुमरेंनी त्या शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. विशेष म्हणजे आमदारांच्या समर्थकांनीही शेतकऱ्याला चोप दिला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे.