मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 500 मीटरवर गोळीबार, गुंडाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 10:16 PM (IST)
नागपूर : नागपुरातील गुन्हेगारीचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. नागपूरमध्ये गोळीबारात सचिन सोमकुवर नावाच्या गुंडाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या गोकुळपेठ बाजारात भरदिवसा ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर हा परिसर आहे. दोन ते तीन हल्लेखोरांनी सोमकुवर याच्यावर जवळपास 10 गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांची पळापळ झाली. मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. त्यामुळे नागपुरात आता पुन्हा टोळीयुद्ध शमवण्याचं आवाहन नागपूर पोलिसांसमोर आहे.