नागपूरमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार, 6 जण ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 09:18 AM (IST)
नागपूर: नागपूरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महिलेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. गुंगीचे औषध देऊन महिलेचं बेशुद्ध अवस्थेत अपहरण करण्यात आलं त्यानंतर रामनगर परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी 7 आरोपींपैकी 6 आरोपींना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. नागपूरमधील अत्यंत रहदारी असणाऱ्या बाजार परिसरात स्वयंरोजगार करणाऱ्या या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिथून तिचं अपहरण केलं. बलात्काराच्या या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली आहे.