VIDEO: नागपुरात धनदांडग्यांचा जीवघेणा खेळ, घराच्या गॅलरीतून गोळीबार
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 01:35 PM (IST)
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये कायदा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. काही धनदांडग्यांनी आपल्या घराच्या गॅलरीतून खुलेआम गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी बिनधास्तपणे गोळीबार करतात आणि त्याचं मोबाईल शूटही करतात. नागपूरमधील या धनदांडग्यांनी मौजमजेसाठी गोळीबार केल्याचं समजतं आहे. खुलेआम गॅलरीतून गोळीबार करणाऱ्या या धनदांडग्यांना कुणीचीही भीती नसल्याचं दिसतं आहे. गॅलरीतून गोळीबार करणारे तरुण डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील आरोपी असून रवी अग्रवाल आणि गोपी मालू अशी दोघांची नाव आहेत. घराच्या गॅलरीतून हे तरुण समोरच्या दिशेनं गोळीबार करत होते. त्यामुळं नागपुरात आरोपींना पोलिसांचं भय राहिलं आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. VIDEO: