नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील जेवणातून गोड पदार्थ वजा करण्यात आले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा गडकरींनी हा निर्णय घेतला आहे.


जयललिता यांचं सोमवारी (5 डिसेंबर) रात्री 11.30 वाजता निधन झालं. त्यानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा तर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

PHOTO : नागपुरात गडकरींच्या मुलीचा शाही विवाह सोहळा


 

नितीन गडकरी यांच्या मुलीचं लग्न रविवारी नागपुरात पार पडलं. तर आज नागपुरातच लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. पण जयललिता यांच्या निधनानंतर हा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडेल.

जेवणात एकही गोड पदार्थ न ठेवण्याचा निर्णय गडकरी कुटुंबीयांनी घेतला आहे. तसंच या समारंभासाठी फुलांची मोठी सजावट टाळून अतिशय साधीच सजावट केली जाईल.