नागपूर : गार हवा देणाऱ्या उपकरणांची योग्य काळजी न घेतल्यास ती जीवावर बेतू शकतात. नागपुरात 24 तासांतच दोघींना कूलरचा शॉक लागून जीव गमवावा लागला.
छाया राजेश नारनवरे या महिलेचा रविवारी कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाला. नागपूरच्या अनंतनगर भागात ही घटना घडली.
तर स्वागतनगर भागात शनिवारी कुलरचा शॉक लागून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. 5 वर्षीय खुशी कोसे फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत होती. पण अनावधनाने तिचा खांदा शेजारी असलेल्या कुलरला लागला आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला.