रेल्वेच्या धडकेने मृत्यू, रात्रभर मृतदेह रेल्वे ट्रॅक शेजारीच
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2017 10:35 PM (IST)
वर्धा : पुलगाव लगतच्या वर्धा नदीच्या मोठ्या रेल्वे पुलाजवळ रेल्वेची धडक बसून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र या घटनेनंतर मृतदेह तब्बल 12 तास एकाच जागी पडून राहिला. अपघाताची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने मृतदेह ट्रॅकवरून शेजारच्या ओट्यावर ठेवण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने पंचनामा होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथील रहिवासी हरीश ठाकरे असं मृतकाचं नाव आहे. काल रात्री काम संपवून गावी रेल्वे ट्रॅकवरुन परत जाताना ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.