नागपूर : "जून, जुलै आणि ऑगस्टच्या सरासरीपेक्षा 6 जुलैला नागपुरात जास्त पाऊस झाला. पावसात ज्यांचं नुकसान झालं, त्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल," असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपुरात मागील आठवड्यातील शुक्रवारी झालेल्या पावसावर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं.

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी नागपूरमध्ये उद्भवलेली पूरस्थिती, विधानभवन परिसरात शिरलेलं पाणी यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी सरकाराला धारेवर धरलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नागपुरात तुफान पाऊस, विधानभवनात वीज गायब, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी

6 जुलैला नागपुरात जास्त पाऊस : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, "संपूर्ण नागपूर जलमय होतं. जून, जुलै आणि ऑगस्टच्या सरासरीपेक्षा 6 जुलैला नागपुरात जास्त पाऊस झाला. कन्स्ट्रक्शनमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पण ते लगेच निघूनही गेलं. यात लोकांचं नुकसान झालं, सर्व्हे केले आहेत. त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. पोलिसांनी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये चांगली भूमिका निभावली. महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित काम केलं.

विधानभवनात सर्व व्यवस्था करणं आवश्यक होतं. पावसामुळे पाणी आत शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्याची गरज होती. पण थोड्या वेळाने पुरवठा सुरु झाला. पावसामुळे विधानभवनात जी परिस्थिती निर्माण झाली, त्याची चौकशी केली जाईल. कोणी हलगर्जीपणा केला असेल तर चौकशी करु."

विधीमंडळाबाहेर पाणी तुबलं, नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच

पावसामुळे विधीमंडळाचं कामकाज बाधित
नागपूरमध्ये शुक्रवारी (6 जुलै) पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला. पाणी विधानभवना शिरल्याने वीज पुरवठा खंडित केला होत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं होतं. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे.

शिवसेनेसह विरोधकांची टीका
नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेसह विरोधकांनी भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं. कोणतीही पूर्वतयारी न करताना, सरकारने पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरला घेतलं. यासंबंधित सचिवांच्या अहवालानंतरही सरकारने अधिवेशन नागपुरात घेतल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

मुख्यमंत्र्याचंं संपूर्ण निवेदन