14 नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष!
एबीपी माझा वेब टीम | 15 Dec 2016 04:17 PM (IST)
मुंबई : नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पुणे आणि लातूरच्या 14 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही इतर पक्षांना मागे टाकत भाजपने मुसंडी मारली आहेय 14 पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर एका नगरपालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा विजय झाला आहे. याशिवाय उर्वरित चार नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्षांकडे गेलं आहे.