नागपुर : नागपूरच्या काटोलमध्ये 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शौकत अली खोजा असं या तरुणाचं नाव आहे. एका विहिरीत त्याचा हा मृतदेह सापडला आहे. क्रिकेटसाठीच्या बेटिंगमधून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
हत्या झालेला तरुण हा नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजचा विद्यार्थी होता. बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकणारा शौकत अली 23 जूनपासून बेपत्ता होता. 25 जूनला त्याचा मृतदेह जलालखेडामध्ये विहिरीत सापडला. त्याच्या शरीरारावर जखमाही आढळल्या आहेत.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतलं आहे. हत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास चालवला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. युवकांमध्ये क्रिकेट बेटिंगच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.