कोल्हापुरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या, आरोपी फरार
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 09:37 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापुरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. शहरातल्या सदर बाजार परिसरात राहणारा शंकर बनसोडे आपल्या आई आणि भावासोबत घरात झोपला असताना अज्ञात व्यक्तिनं त्याच्या डोक्यात दगड घालून पळ काढला. शंकरच्या आवाजानं त्याची आई आणि भाऊ जागे झाले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. गवंडी काम करणाऱ्या बनसोडेची अशी हत्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातो आहे.