राज ठाकरेंनी काटोलमध्ये येऊन निवडणूक लढवावी, आशिष देशमुखांचं आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 06:03 PM (IST)
नागपूर : मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घातल्यानंतर काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन माझ्या विरोधात काटोलमधून निवडणूक लढवावी असं आव्हान देशमुख यांनी दिलं आहे. आमदार आशिष देशमुख यांनी पत्रक काढून राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंना काटोलमधून निवडणूक लढवता यावी यासाठी आपण राजीनामा देऊ आणि पोटनिवडणुकीसाठी उभा राहू असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. गोंधळ घालणे म्हणजे कोणताही पराक्रम गाजवला नसल्याचंही देखमुख यांनी पत्रकातून म्हटलं आहे. दरम्यान, आमदार आशिष देशमुख यांच्या आव्हानावर मनसेच्या गोठातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.