मुंबई : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवांचे मेसेज फिरत आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत अशी पोस्ट मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज फेक असल्यानं कृपा करुन ती व्हायरल करु नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.


पोस्टमध्ये काय लिहले ?
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत. यामध्ये किराणा माल, भाजीपाला, केमिस्ट, दूधविक्रेते यांची दुकानं खुली राहणार आहे. पण मुंबई पोलिसांनी इथे खरेदी करण्यासाठी वेळा दिल्या आहेत अशी पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट कोरोना विषाणू एवढीच घातक आहेत असं लिहित मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फेक व्हायरल मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.


मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरवरून हा मेसेज फेक असून मुंबईकरांना फेक मेसेज न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, मी मुंबईचा पोलिस आयुक्त आहे. मी अशाप्रकारच्या कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत त्यामुळे या पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करुन घ्या असं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO

Coronavirus | कोरोना व्हायरस हवेतून पसरतोय? जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी म्हणतात...

Superstitions on Corona | दिव्यांच्या प्रकाशात कोरोना पळून जातो! धुळ्यात अंधश्रद्धेचा बाजार!