मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अद्यापही या व्हायरसवर कोणहीती लस किंवा औषध तयार झालेलं नाही. मात्र कोरोनाबद्दल अनेक समज आणि गैरसमज मात्र वेगाने पसरत आहेत. यापैकी एक गैरसमज म्हणजे कोरोना हवेतून पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. "कोविड-19 हवेमार्फत पसरतो असं आतापर्यंत समोर आलेलं नाही. हा विषाणू शिंक किंवा खोकला आल्यावर नाका-तोंडातून निघणाऱ्या ड्रॉपलेट्समधून तसंच संपर्कातून होतो," असं पूनम खेत्रपाल यांनी सांगितलं.
कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "कोविड-19 हवेतून पसरत असल्याचा कोणताही अहवाल नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाका-तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्समधून आणि संसर्गातून पसरतो. त्यामुळे लोकांनी हाताची स्वच्छता आणि खोकताना-शिंकताना खबरदारी घेण्याचा सल्ला डब्लूएचओ देत आहे."
Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या घरात
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 499 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहे. मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. हा विषाणू पसरण्यापासून त्याच्या उपचारांपर्यंत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळ या अफवा फेटाळत आहे.
लॉकडाऊन आणि संचारबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील जवळपास सर्व राज्ये लॉकडाऊन आहेत. महाराष्ट्र, पंजाबसह काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता प्रवासी वाहतूक व्यवस्था पूर्णत: बंद करण्यात आलं आहे. बहुतांश राज्यांनी विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. सरकार लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहे.
सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह