मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही भाडेवाढ मान्य झाल्यास पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेचं तिकीट वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पश्चिम रेल्वेला झालेला 1,400 कोटींचा तोटा भरुन काढण्याची हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या तिकीटदरात 47 टक्क्यांनी तर सेकंड क्लासच्या तिकीट दरात 38 टक्क्यांनी भाडेवाढ होऊ शकते. लोकलच्या तिकीटासोबत पासचीही दरवाढ होणार आहे. सध्या किमान तिकीटासाठी असलेलं 9 किमीची मर्यादाही 5 किमीवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिचाला चाट बसणार आहे.
प्रवासाचा मार्गअंतरसिंगल तिकीटमासिक पास
  फर्स्ट क्लाससेकंड क्लासफर्स्ट क्लाससेकंड क्लास
  आताप्रस्तावितआताप्रस्तावितआताप्रस्तावित
चर्चगेट-मुंबई सेंट्रल1-51010100100340340
चर्चगेट-दादर6-151010130160485600
चर्चगेट-अंधेरी16-251015215215665850
चर्चगेट-बोरीवली26-351520215250750965
सीएसटी-दादर1-10510130160485600
सीएसटी-घाटकोपर11-201015130180565700
सीएसटी-ठाणे31-351520215250750965
सीएसटी-कल्याण51-55152031533010951300