मुंबई: मायानगरी मुंबई आणि पुण्यात सातत्याने वाढणाऱ्या घरांच्या किमती, यंदा मात्र वेगाने उतरत आहेत.


मुंबईत घरांच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची कपात झाली आहे. गेल्या दहा वर्षात मुंबईतील घरांच्या किमती पहिल्यांदाच इतक्या खाली घसरल्या आहेत.

नाईट फ्रँक इंडिया या संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

नोटाबंदी, जीएसटी आणि रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट अर्थात रेरामुळे घरांच्या किमती उतरल्याचं सांगण्यात येत आहे.

पुण्यातील घरांच्या किमतीही उतरल्या आहेत. पुण्यात घरांच्या किमती 7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

मुंबईत घरांच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यातच मुद्रांक शुल्कसह अन्य फीमधील कपात, यासह घरांच्या किमतीतील कपात दहा टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

बांधकाम क्षेत्रात सातत्याने अस्थिरता आहे. त्यातच नोटाबंदी आणि जीएसटीसोबतच रेरा कायदा लागू झाला.  त्याचाच परिणाम घरांच्या किमतीवर दिसून येत आहे.