Phone Tapping Case :  पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पाणांचे चार्जशीट दाखल केले आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात ( Colaba Police Station ) शुक्ला यांच्या विरोधात हे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. 


मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये 20 शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब  नोंदवण्यात आले आहेत.






संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.   


फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकारने पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने  चौकशीचे आदेश दिले होते. या त्रिसदस्यीय समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते.


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग  केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला होता. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता.  याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.


महत्वाच्या बातम्या


Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी बोगस नावं वापरल्याचा खुलासा; संजय राऊतांसाठी एस. रहाटे, तर खडसेंसाठी...


Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे