मुंबई : मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले 40 वर्षीय पोलीस हवालदार सुरेश चव्हाण यांनी अंधेरी मरोळ भागात त्यांच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने जवळच्या होली स्पिरिट रुग्णालयात नेण्यात आले, पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कर्मचाऱ्याचा जीव गेला होता. 


या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण ठाण्याच्या मुंब्रा पोलीस ठाण्यात तैनात होते. काल रक्षाबंधनाचा सण होता आणि चव्हाण यांच्या  पत्नी आणि दोन मुले राखी बांधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते.


चव्हाण यांचे कुटुंबिय जेव्हा काल संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला पण काहीच उत्तर मिळाले नाही.  बऱ्याच वेळानंतर शेजाऱ्याने घराचा दरवाजा तोडून आत गेले आणि सुरेश कॉन्स्टेबल पंख्याला लटकलेला दिसले. घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी पोलिसांनी धाव घेऊन पोलीस हवालदार यांचा बॉडी आपल्या ताब्यात घेऊन पीएम साठी रुग्णालयात पाठवण्यात आली. मात्र अशा पद्धतीने या पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुद्धा एम.आय.डी.सी पोलीस करत आहे. 


कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतरही पोलिसांना चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलीस आता अधिकचा तपास सुरु करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या :