Narayan Rane Case LIVE: नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही

Narayan Rane Gets Bail LIVE Updates : मुख्यमंत्र्यांबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंच्या अडचणींत वाढ, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Aug 2021 04:14 PM
यवतमाळ जिल्ह्याच्या भाजप  पदाधिकारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार

यवतमाळ जिल्ह्याच्या भाजप  पदाधिकारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार  दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केले होते आक्षेपार्ह वक्तव्य. त्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे  नितीन भुतडा आणि यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये भाजप सरचिटणीस राजू पडगीलवार यांनी भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जी फिर्याद दाखल केली त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टात दाद मागणार अशी  माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली. 

नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही, जामिनाच्या अटीशर्ती मात्र पूर्ण कराव्याच लागतील

नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही, जामिनाच्या अटीशर्ती मात्र पूर्ण कराव्याच लागतील

नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

नारायण राणे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरु

नारायण राणे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरु, याचिका तयार केल्यानंतरही काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेत, त्या सर्व एकत्र करून आम्हाला त्यानुसार याचिका तयार करावी लागेल, नारायण राणे यांच्या वकिलांचा युक्तिवाद 

नारायण राणेंच्या याचिकेवर हायकोर्टात 3:30 वाजता सुनावणी सुरू होणार

नारायण राणेंच्या याचिकेवर हायकोर्टात 3:30 वाजता सुनावणी सुरू होणार. राणेंच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ सतीश मानेशिंदे करणार युक्तिवाद. राज्यात विविध ठिकाणी दाखल गुन्हे रद्द करण्याची याचिकेत प्रमुख मागणी. राज्य सरकारच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार.

नारायण राणेंच्या याचिका हायकोर्टात दाखल, दुपारी 2:30 वाजता सुनावणी

नारायण राणेंच्या याचिका हायकोर्टात दाखल, दुपारी 2:30 वाजता सुनावणी,


राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात याचिका,


पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंच्या याचिकेत प्रमुख मागणी,


दाखल गुन्हे चुकीच्या कलमांखाली दाखल झाल्यानं ते रद्द करण्याचीही याचिकेत मागणी,


पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी राणे प्रयत्नशील,

शिवसेना राणे यांच्यातील वादाचा दुसरा अंक नशिकमध्ये सुरू, 

शिवसेना राणे यांच्यातील वादाचा दुसरा अंक नशिकमध्ये सुरू,  सामना अग्रलेखाबाबत झळकावले होर्डिंग,  पोलिसांनी नाकारली परवानगी, परवानगी न घेता लावलेला होर्डिंग काढण्याच्या सूचना,  

घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे नारायण राणे यांनी न्यायालयात लिहून दिले म्हणून अटक नाही, दीपक पांडे यांची माहिती

नारायण राणे यांना नोटीस दिली आहे. 2 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांनी हजर राहायचे आहे.  अन्यथा त्यांना अटकेची कारवाई केली जाणार. राणे यांना समजपत्र दिले त्यावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे ते येतील अशी अपेक्षा आहे. राणे यांची सहकार्याची भूमिका आहे, न्यायालयाने त्यांना जामीन दिला त्यामुळे नाशिक पोलिसांनी अटक केली नाही. घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे नारायण राणे यांनी न्यायालयात लिहून दिले म्हणून अटक नाही, दीपक पांडे यांची माहिती

केंद्रीय मंत्री नारायण यांना नोटीस बजावून नाशिक पोलिसांची टीम माघारी

केंद्रीय मंत्री नारायण यांना नोटीस बजावून नाशिक पोलिसांची टीम माघारी,  मध्यरात्री निघालेली पोलिसांची टीम सकाळी शहरात दाखल,  पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक यांच्यांसाह जवळपास25 जणांचा ताफा गेला होता कोकणात, नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यासंदर्भात 2 सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस

नाशिक शहरातील शिवसेना-भाजप राडा प्रकरणी दिवसभरात 130 हुन अधिक कार्यकर्त्यांवर  गुन्हे दाखल

नाशिक शहरातील शिवसेना-भाजप राडा प्रकरणी दिवसभरात 130 हुन अधिक कार्यकर्त्यांवर  गुन्हे दाखल, भाजप कार्यालय फोडल्या प्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह जवळपास 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल,


 तर शिवसेनेच्या कार्यालयावर चाल करून गेल्या प्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणेसह जवळपास 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, 


, भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल,  नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी भाजप कार्यालय फोडले आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते

Narayan Rane Gets Bail : नारायण राणे यांना जामीन मंजूर

नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे

Narayan Rane Arrested LIVE : नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर

Narayan Rane Arrested LIVE : नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर

2011च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी राज्य सरकारला मिळावी या मागणीवर केंद्रानं तीन आठवड्यात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

2011च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी राज्य सरकारला मिळावी या मागणीवर केंद्रानं तीन आठवड्यात उत्तर द्यावं, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले.  या प्रकरणातली पुढची सुनावणी आता 23 सप्टेंबरला होणार आहे

नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत, पोलीस तपासासाठी दिलेली कारणे योग्य नाहीत, राणेंच्या वकीलांकडून युक्तिवाद

नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत,  पोलीस तपासासाठी दिलेली कारणे योग्य नाहीत, राणेंच्या वकीलांकडून युक्तिवाद

महाड : नाशिक आणि पुणे पोलीस महाडमध्ये उपस्थित, सूत्रांची माहिती

महाड : नाशिक आणि पुणे पोलीस महाडमध्ये उपस्थित, सूत्रांची माहिती, न्यायालयात जमीन मंजूर झाला तरी नाशिक पोलिसांकडून राणेंना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता

नारायण राणे महाड कोर्टात हजर, सुनावणी सुरु, नारायण राणे यांच्या पत्नी कोर्टात सुनावणीला उपस्थित

नारायण राणे महाड कोर्टात हजर, सुनावणी सुरु, नारायण राणे यांच्या पत्नी कोर्टात सुनावणीला उपस्थित

Narayan Rane Arrested : नारायण राणे महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल, थोड्यात वेळात न्यायालयात सुनावणी होणार

नारायण राणे महाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल, थोड्यात वेळात न्यायालयात सुनावणी होणार, राणे महाडमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सोलापूर :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याने सोलापुरात भाजपच्यावतीने निदर्शने

सोलापूर :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याने सोलापुरात भाजपच्यावतीने निदर्शने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने कन्ना चौकात आंदोलन, भाजपकडून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भाजप कार्यकर्त्यांनी जळगाव - अकोट राज्यमार्ग गेल्या एक तासापासून रोखुन धरला

बुलढाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलडाण्यात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजप कार्यकर्त्यांनी जळगाव - अकोट राज्यमार्ग गेल्या एक तासापासून रोखुन धरला आहे , भाजप कार्यकर्ते आघाडी सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत असून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते गेल्या एक तासापासून रास्ता रोखो करत आहेत.

नारायण राणेंच्या अटकेनंतर पुढची जन आशीर्वाद यात्रा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढची जन आशीर्वाद यात्रा ही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याकरिता प्रविण दरेकर रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत...थोड्याच वेळात दरेकरजी रत्नागिरी मध्ये दाखल होणार आहेत

Narayan Rane Arrest : रत्नागिरी संगमेश्वर पोलीस स्टेशनमधून नारायण राणे महाड कोर्टाच्या दिशेने रवाना

Narayan Rane Arrest : रत्नागिरी संगमेश्वर पोलीस स्टेशनमधून नारायण राणे महाड कोर्टाच्या दिशेने रवाना 

Narayan Rane Arrested : भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकाचा सत्कार

कल्याण येथील भाजप कार्यालय आज शिवसैनिकांनी फोडले कार्यालयाबाहेर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना  मारहाण केली. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजप कार्यालयाची काच फोडणाऱ्या शिवसैनिक अमोल गायकवाड यांच्या हाताला दुखापत झाली होती  अमोल गायकवाड याचा कल्याण शिवसेना शहर शाखेत सत्कार करण्यात आला.

Narayan Rane Arrest LIVE: नारायण राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया

जेपी नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, ही यात्रा सुरुच राहणार.



Narayan Rane Arrested Kalyan Update : कल्याणमध्ये शिवसेनेची भाजप कार्यालयावर दगडफेक

नारायण नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप अशी वादाची ठिणगी पडली .याचे पडसाद कल्याण डोंबिवली मध्ये देखील म्हटले कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरात शिवसेना शहर शाखेकडून तीव्र आंदोलन करत घोषणाबाजी करत नारायण राणे यांचा निषेध नोंदवण्यात आला .याच दरम्यान शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवे यांच्यासह शिवसेना  कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौक येथील भाजपचे शहर कार्यालयाला लक्ष केले .शहर कार्यालयावर दगडफेक करत  कार्यालयाच्या काचा फोडल्या तसेच कार्यालय बाहेर उभ्या असलेल्या दोन भाजप  पदाधिकाऱ्यांना देखील बेदम मारहाण केली .

Narayan Rane Arrested: नारायण राणेंसारख्या व्यक्तीने मुख्यमंत्री यांच्या विरोधात असे विधान करणे चुकीचे, शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

नारायण राणेंसारख्या व्यक्तीने मुख्यमंत्री यांच्या विरोधात असे विधान करणे चुकीचे, शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया, राजकीय सूडबुद्धीने कुठलीही कारवाई केली जात नाही

Narayan Rane Arrested Latest Update : नारायण राणेंची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार, भाजप कार्यकर्त्यांचा दावा

नारायण राणेंची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार, भाजप कार्यकर्त्यांचा दावा

BJP Leader Narayan Rane Case : नारायण राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरु 

कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्थानबद्ध करण्यात येत आहे. नारायण राणेंना अटक केल्यानंतर किंवा स्थानबद्ध केल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती घेण्यात येत आहे. 

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सध्यातरी नारायण राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

लातुरात नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फाशी देण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. सध्या राज्यभर नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहावयास मिळत आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापलेले दिसून येत आहेत. राज्यभरात नारायण राणे यांच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. 


 

मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकच राज्याची सुव्यवस्था बिघडवत आहेत- नितेश राणे

आम्ही कोणी मुंबईत नसताना आमच्या घरासमोर आंदोलन केलं. यावर मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनीच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवली असल्याचा आरोप आमदार नितेश राणे म्हणाले. जनआशीर्वाद यात्रा ही मोदींनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असं नितेश राणे म्हणाले. 

नारायण राणेंना वेड्यांच्या रुग्णालयात भरती करा; परभणीत नारायण राणे विरोधात शिवसेनेचे आंदोलन

नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यामुळे त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची मागणी परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी केली आहे. परभणीत आज शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे व गॅंगला आम्ही धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार  नसल्याचा इशारा ही देण्यात आलाय. 

मुंबईतील जुहूमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

मुंबईतील जुहूमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले होते. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. युवासेने नेते वरुण सरदेसाई स्वत: मैदानात उतरले होते. त्यांच्या नेतृत्त्वात युवासेनेने नारायण राणे यांच्या जुहूतील घरावर धडक दिली. राणेंच्या घराबाहेर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटात धुमश्चक्री झाल्याने पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागला.

नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्याच्या अपमान करण्याचा हेतू नव्हताच: रामदास आठवले

नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्याच्या अपमान करण्याचा हेतू नव्हताच. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की राज्याचा विकास होत नाहीये, मुख्यमंत्री न्याय देऊ शकत नाहीये म्हणून राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे वक्तव्य केले असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. हे वक्तव्य का आणि कशाबद्दल केलं याचा खुलासा नारायण राणे स्वतः  करतीलच असंही ते म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे नाराज आहेत, शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत याची जाणीव असल्यामुळेच अशा पद्धतीने राणे विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे असंही आठवले यांनी सांगितलं. 


 

मुळात ही ठाकरी शैली नाहीच, ठाकरी शैली कोणावर सूड उगवत नाही : किशोरी पेडणेकर

सध्या नारायण राणे जे बोलले ते ठाकरी शैलीत बोलले, असं म्हणत भाजपकडून त्यांची पाठराखण केली जात आहे. याबाबत विचारलं असता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मुळात ही ठाकरी शैली नाहीच, ठाकरी शैली कोणावर सूड उगवत नाही. आता पळवाटा काढत आहेत. कानफाटात मारीन, कोणाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या? जे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत त्यांच्या. ही कुठली ठाकरी भाषा? आधी भाजपनं शिकून घ्या" 

शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात, नाशकात भाजप कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक

नाशिक : शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. नाशकात भाजप कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान,मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. 



नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नारायण राणे यांची अटक टाळण्यासाठी वकीलांसोबत कायदेशीर प्रक्रियेवर चर्चा सुरु

नारायण राणे यांची वकीलांसोबत कायदेशीर प्रक्रियेवर चर्चा सुरु, अटक टाळण्यासाठी कायदेशीर राणे कायदेशीर सल्ला घेत आहेत. दरम्यान, नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. नाशिक आणि पुणे पोलिसांची पथकं नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणात रवाना झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूणला रवाना

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूणला रवाना. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचा या पथकांमधे समावेश.  पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधे नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने चिपळूणला रवाना.  नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालेत.  जे पथक आधी पोहचेल ते पथक अटकेची कारवाई सुरु करणार.

हे भाजपने घडवलेले नारायण राणे आहेत की हे संस्कार राणेंनी भाजपमध्ये रुजवलेत, याचा खुलासा आता भाजपनेच करावा : भास्कर जाधव




नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. नाशिक आणि पुणे पोलिसांची पथकं नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणात रवाना झाली आहे. अशातच यासर्व प्रकरणी अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. 








 

"मा. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. भाजपची एक घोषणा होती, 'आहे तसे घेऊ, पाहिजे तसे घडवू'. त्याप्रमाणे हे भाजपने घडवलेले नारायण राणे आहेत की हे संस्कार राणेंनी भाजपमध्ये रुजवलेत, याचा खुलासा आता भाजपनेच करावा.", असं ट्वीट भास्कर जाधव यांनी केलं आहे.






Narayan Rane यांना अटक होणार? राजकीय विश्लेषक Ravikiran Deshmukh यांना काय वाटतं?

नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. नाशिक आणि पुणे पोलिसांची पथकं नारायण राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणात रवाना झाली आहे. यासर्व प्रकरणीराजकीय विश्लेषक Ravikiran Deshmukh यांनीही विश्लेषण केलं आहे. जाणून घेऊया त्यांना नेमकं काय वाटतं... 


नारायण राणेंविरोधात शिवसेना आक्रमक, प्रत्येक जिल्ह्यात, वॉर्डात शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाची तयारी सुरु

मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. आता याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून पुन्हा राणे वि. शिवसेना सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात, वॉर्डात शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाची तयारी सुरु केली आहे.


नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूणला रवाना

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं चिपळूणला रवाना. दोन पोलीस निरीक्षकांसह एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश. पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस तातडीने चिपळूणला रवाना झाले आहेत. नाशिकमधेही राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीसही राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालेत. जे पथक आधी पोहोचेल ते पथक अटकेची कारवाई सुरु करणार आहे.

नारायण राणेंवर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही करू; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नारायण राणेंना इशारा

नारायण राणेंवर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही करू; असा इशारा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नारायण राणेंना देण्यात आला आहे. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. 

खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ, निलेश राणेंचं शिवसैनिकांना आव्हान

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. निलेश राणे यांनी याप्रकरणी ट्वीट केलं आहे.


"कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.", असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. 





हिंमत असेल तर समोर या दोन हात करायला, निलेश राणेंकडून शिवसेनेला इशारा

Narayan Rane VS Shiv Sena Row LIVE : हिंमत असेल तर समोर या, दोन हात करायला; अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. या संभाव्य अटकेच्या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

नारायण राणेंच्या मुंबईतील घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त, युवासेनेच्या कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश

युवासेनेकडून राणेंच्या जुहूच्या बंगल्याबाहेर जमण्याचे आदेश देण्यात आले असून त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

नारायण राणे यांच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल, नाशिक, महाडपाठोपाठ आता पुण्यात गुन्हा दाखल

Narayan Rane : मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. नारायण राणे यांच्यावर आता तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक, महाडपाठोपाठ आता पुण्यातही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद दौऱ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काल केलेल्या चिथावणीखोर वक्त्यव्यानंतर आता नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटल्याचं दिसून येतंय. नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूनकडे रवाना झाले आहेत. 

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी शिवसैनिक संतप्त, मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेची बॅनरबाजी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबईतील दादर टीटी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनर लावून त्यावर "कोंबडी चोर !!!" असे शब्दं लिहीले आहेत. त्यामुळे मुंबईत वातावरण तणावपूर्ण झालंय. याचे पडसाद आणखी तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्तं केली जात आहे.



...तर कानाखालीच चढवली असती, मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


काय म्हणाले होते नारायण राणे?


नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पथक रवाना

मुख्यमंत्र्यावर केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. सध्या नारायण राणे चिपळूणात आहेत. 


 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

नाशकात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल, अटकेचे आदेश

नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांना कानशिलात लावण्याच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंच्या अडचणींत वाढ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. 

पार्श्वभूमी

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. 


नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पथक रवाना


मुख्यमंत्र्यावर केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. सध्या नारायण राणे चिपळूणात आहेत. 


महाडमध्येही गुन्हा दाखल... 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


काय म्हणाले होते नारायण राणे? 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.