मुंबई : मुंबई महापालिकेच्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज बोर्डाच्या शाळानंतर आता आयबी बोर्डाच्या शाळा बीएमसीकडून सुरू केल्या जाणार आहे. याबाबत आयबी बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली आहे. सकारात्मक झालेल्या चर्चेनंतर मुंबई महापालिका शाळांमध्ये सुद्धा सीबीएसई ,आयसीएसई, केंब्रिज बोर्ड प्रमाणे आता आयबी बोर्ड अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासह या शाळांमध्ये मराठी भाषेची शिकवण सुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळे लवकरच आयबी बोर्डाचा अभ्यासक्रम बीएमसी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिकवला जाईल. त्यामुळे बीएमसीच्या शाळांमध्ये पालक, विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. याआधी सप्टेंबर 2021 मध्ये बीएमसी शिक्षण विभागाने केंब्रिज बोर्डासोबत करार केला होता. त्यानुसार पुढील वर्षीपासून केंब्रिज बोर्ड अभ्यासक्रम शिकवणारी बीएमसी शाळा सुरू होणार आहे.
मुंबई महापालिका शाळेत इतर बोर्डच्या अभ्यासक्रमाला वाढता प्रतिसाद पाहता मुंबईत 11 सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा बीएमसी कडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात आता भर म्हणून केंब्रिज बोर्ड आणि आयबी बोर्ड अभ्यासक्रम शिकवणारी शाळांची सुद्धा भर पडेल. आयबी मंडळाच्या विविध शैक्षणिक टप्प्यांपैकी प्रायमरी इयर प्रोग्राम (पहिली ते पाचवी ) या टप्प्याचा प्राथमिकतेने विचार करून तो पालिका शाळांत सुरु केला जाणार असल्याची माहिती आहे. या दरम्यान शिक्षण प्रशिक्षण, आवश्यक त्या सोयी सुविधांच्या सहाय्याने उत्तमोत्तम दर्जाचे शिक्षण आणि सर्वतोपरी सहकार्य आयबी मंडळाकडून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :