गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2016 02:21 AM (IST)
मुंबई : गिरणी कामगार आणि वासरदारांच्या घरांची सोडत आज जाहीर होणार आहे. सहा बंद गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या 2634 घरांची सोडत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या लॉटरीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबिली या गिरण्यांमधील या कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना ही घरं मिळणार आहेत. सहा गिरण्यांचे सहाच कोड असल्याने सोडतीचा कार्यक्रम एक ते दोन तासांतच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.