नागपूर : बीफ बॅनच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची चाचपणी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संघाच्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केली.

 
या बैठकीत मंत्रिमंडळाच्या नियोजित विस्तारावरही चर्चा झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संघ मुख्यालयात दाखल झाले होते. येथे तब्बल दोन तास त्यांनी संघाच्या नेत्यांशी चर्चा केली.

 
चर्चेचा सविस्तर तपशील बाहेर आला नसला तरी बीफ बॅनचा मुद्दाच चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.