ठाणे : मध्य रेल्वेची वाहतूक अडीच तास उशिराने सुरु आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवर सकाळची 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आल्याने संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. प्रवाशांनी रेल्वे रोखल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा सुरु आहे.


 

भिवपुरी स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहे. परिणामी सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

 

दरम्यान, प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या ऑफिसला घेराव घातला. उद्यापासून गाड्या वेळेवर धावतील, असं लेखी पत्र प्रवासी स्टेशन मास्तरकडून लिहून मागत आहेत.