मुंबई: श्रीकांत शिंदे तरुण आहे, मेहनत करतो, जी जबाबदारी देईल ती पार पाडतो अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोर ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंचे कौतुक केलं. ते ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुण आहे, खूप मेहनत घेतोय. त्याच्यावर एखादी जबाबदारी दिली की तो ती पार पाडतोच. अंबरनाथमध्ये एक प्राचिन मंदिर होतं. मी त्याला म्हणालो की, श्रीकांत काहीतरी कर तिकडे. तर त्याने या मंदिराच्या परिसरात खूप चांगलं काम केलं. आता त्या ठिकाणी जाणं म्हणजे पवित्र वाटतंय. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या मार्गिकेसाठी अनेक अडचणी आल्या. स्थानिक पातळीवर अनेक अडचणी सोडवण्यात आल्या. त्यासाठी पंतप्रधान मोदींचीही मदत झाली. त्यामुळेच हे दिवास्वप्न आज सगळ्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होते आहे. ज्याचा फायदा आपल्या नागरिकांना होणार आहे. हजारो, लाखो प्रवासी माता-भगिनी, बांधवांना होणार आहे. विकास हा वाहतुकीच्या मार्गांद्वारेच होत असतो. मग ती मेट्रो असो, रस्ते असो जलमार्ग असोत, जशा शरीरात रक्तवाहिन्या असतात. तसे हे मार्ग विकासवाहिन्या आहेत. त्यांचे जाळे घट्ट, विण घट्ट असेल तर विकास अधिकचा होतो.


मुंबईमध्ये ज्या गोष्टीची सुरवात होतं. त्याच जाळं देशभर पसरते. त्याचे अनुकरण केले जाते. याचा कालच उल्लेख केला होता. देशातील पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई अशी सुरु झाली होती. इंग्रजांनी ही रेल्वे सुरु केली. त्यावेळी प्रवाशांनी या सेवेचा वापर करावा यासाठी इंग्रज एक रुपयांचे बक्षीस देत असत. इंग्रजच ते पुढे त्यांनी बक्षीस बंद करून तिकीट सुरू केले. आजपर्यंत हा रेल्वेचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर आहे. 


ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन
मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.  ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील 34 फेऱ्या वातानुकूलित असतील आणि दोन फेऱ्या सध्या लोकलच्या असतील. 


संबंधित बातम्या: