मुंबई: एसी लोकलचे तिकीट दर लवकरच कमी करण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले आहेत. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.
एसी लोकलचे तिकीट दर कधी कमी करण्यात येतील असा सवाल विचारल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "थोडा वेळ थांबा, आम्ही मेट्रो आणि इतर गोष्टींचे तिकीट दर बघून मग एसी लोकलचे नवीन तिकीट दर जाहीर करू. ठाणे हेरिटेज स्टेशन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
एसी लोकलचे दर कमी होणार
सध्या मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं एसी लोकलचे दर कमी करण्याचे प्रयत्न रेल्वे बोर्डाकडून सुरू आहेत. या तिकीट दरांमध्ये घट केल्यास त्याचा फायदा अनेकांना होणार असून एसी लोकलच्या प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन
मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील 34 फेऱ्या वातानुकूलित असतील आणि दोन फेऱ्या सध्या लोकलच्या असतील.
महत्त्वाच्या बातम्या: